मुंबई : मराठी भाषा बोलण्यास नकार दिलेल्या परप्रांतीय दुकानदाराला मनसेनं चांगलाच चोप दिला आहे. धानोरी उपगरातील परप्रांतीय व्यावसायिकाने मराठी ग्राहकांशी वाद घालत, मराठी भाषा मला कळत नाही म्हणून मराठी बोलण्यास नकार दिला. त्याला मनसे स्टाईलनं दणका दिला असल्याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धानोरीमध्ये एका मेडिकल स्टोरमधील ही घटना आहे. ग्राहक मेडिकल स्टोरमध्ये गेला असता दुकानातील परप्रांतीय व्यवसायिकाने मराठी ग्राहकांशी वाद घातला. मराठी भाषा मला कळत नाही, महाराष्ट्रात राहतो मराठीतच बोलणे हा नियम आहे का? मी मराठीत बोलणार नाही, काय करायचे ते करा? असे म्हणत उद्धट वर्तन केले.
त्यानंतर त्या परप्रांतीय दुकानदाराला आज मनसे स्टाईल दणका दिला आहे. घटनेचा व्हिडीओ संपूर्ण राज्यात सोशल व्हिडीओवर प्रसिद्ध झाल्यानंतर ही घटना धानोरी प्रभागात घडली आहे, याची माहिती मनसेचे पदाधिकारी व सोशल मीडियाद्वारे कळली. त्यानंतर मनसैनिकांनी दुकानात जाऊन चोप दिला आणि माफी मागण्यास सांगितले.
मनसे स्टाईल पुण्यातील धानोरी मधील परप्रांतीय मेडिकल मालकाने मराठी भाषेचा अपमान करत मराठी बोलण्यास नकार दिला तसेच मराठी मुलाचा अपमान केला होता आज आमचे मनसैनिक श्री गणेश पाटिल व कृष्णा मोहिते, श्री मनोज ठोकळ, श्री येवले, श्री अचितुराव मोरवडे, आदी महाराष्ट्र सैनिकनी चोप दिला.#मनसे pic.twitter.com/TXM6Tx65sD
— Abhishek Mhamunkar (मी पण महाराष्ट्र सैनिक) (@AbhiMhamunkar) July 18, 2024
मनसैनिक काय म्हणाले..?
धानोरी उपगरातील परप्रांतीय व्यवसायिकाने मराठी ग्राहकांशी वाद घालत, मराठी भाषा मला कळत नाही, मराठीतच बोलणे हा नियम आहे का? मी मराठीत बोलणार नाही, काय करायचे ते करा? असे म्हणत हेकेखोर पणे उद्धट वर्तन करणाऱ्याला आज मनसे स्टाईल मराठी दणका दिला. मराठी भाषेचा अवमान घटनेचा व्हिडीओ संपूर्ण राज्यात सोशल व्हिडीओवर प्रसिद्ध झाला. ही घटना माझ्या धानोरी प्रभागात घडले आहे असे मनसेचे पदाधिकारी व सोशल मीडियाद्वारे कळाले. महाराष्ट्र सैनिकांनी तात्काळ याचा समाचार घेणे क्रमप्राप्त होते. यामुळे मराठी भाषा आम्ही मनसे सैनिकांनी त्याला मनसे स्टाईलमध्ये शिकवले, असे मनसैनिक म्हणाले.