Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेले निलंबित आयएएस अधिकारी अनिल रामोड यांची शासनाकडून पुन्हा नियुक्ती; दिली ‘ही’ मोठी जबाबदारी..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 25 September 2024, 20:05

मुंबई : लाचखोर आयएएस अधाकारी अनिल रामोड यांच्या निलंबनाचा कालावधी संपुष्टात आला असून आता शासनाने त्यांची पुन्हा एकदा नियुक्ती केली आहे. अनिल रामोड यांना 2023 मध्ये 8 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्ग विकासासाठी घेतल्या जात आहेत, त्यांना जास्त मोबदला देण्याच्या बदल्यात 8 लाख रुपयांची लाच घेताना रामोड यांना पकडण्यात आले होते. त्यानंतर, त्यांच्यावर या प्रकरणात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. परंतु, आता तब्बल दीड वर्षानंतर त्यांना पुन्हा नियुक्ती देण्यात आली आहे.

अनिल रामोड यांची मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिव म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे, गेल्या दीड वर्षांपासून सेवेच्या प्रतिक्षेत असलेल्या आएएस अधिकाऱ्याला आता सेवेची संधी मिळाली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून अधिकारी रामोड यांचे जून 2023 मध्ये निलंबित करण्यात आले होते. पुण्याच्या तत्कालीन विभागीय आयुक्तांनी तसा प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं.

निलंबनाच्या अहवालात काय?

रामोड यांच्या निलंबनाच्या अहवालात, त्यांनी पुणे मुख्यालय सोडून जाता कामा नये. तसेच खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करता कामा नये. विभागीय आयुक्तांची परवानगी न घेता पुणे शहर सोडू नये, पुढील आदेश येईपर्यंत निलंबन असेल, असे आदेशात म्हटले होते. विशेष म्हणजे त्यांना पुण्यातील येरवाडा तुरुंगातही टाकण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा शासनाच्या सेवेची संधी देण्यात आली आहे.

निलंबन कालावधी संपुष्टात आल्यानंतर, राज्य शासनाकडे रुजू झाल्याने शासनाने आपली नियुक्ती, सदस्य सचिव, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, छत्रपती संभाजीनगर या पदावर करण्यात आली आहे. कुणाल कुमार, भाप्रसे हे अध्ययन रजेवर गेल्यामुळे रिक्त असलेल्या जागी ते पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून आपली नियुक्ती करण्यात आली आहे. तरी आपण नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा, असे पत्रच डॉ. अनिल रामोड यांना अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्या सहीने प्राप्त झाले आहे. त्यामुळे, लाचखोर राहिलेल्या रामोड यांना पुन्हा एकदा सेवेची संधी मिळाली. रामोड यांच्यासह आणखी दोन अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

सतिश कुमार खडकेंना नवी जबाबदारी..

सतिश कुमार खडके यांनाही शासनाने संचालक (आपत्ती व्यवस्थापन), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर लहू माळी, भाप्रसे यांच्या जागी नियुक्ती दिली आहे. हे पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून केली आहे. तरी, आपण नवीन पदाचा कार्यभार माळी, भाप्रसे यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा. तसेच संचालक, विमान चालन, मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभारही पुढील आदेश होईपर्यंत आपल्याकडेच सोपविण्यात येत आहे. तरी सदर पदाचा अतिरिक्त कार्यभारही आपण माळी, भा.प्र.से. यांच्याकडून त्वरीत स्विकारावा, असे बदली आदेशात म्हटले आहे. तसेच अजीज शेख यांची शासनाने व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई या रिक्त पदावर बदली केली आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

आरोग्यासाठी फायदेशीर..! तूप खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

Saturday, 17 May 2025, 23:24

बस स्थानकात चोरट्यांचा प्रताप..! सोन्याचे कानातले चोरताना महिलेचा तुटला कान; प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण

Saturday, 17 May 2025, 22:58

संजय राऊतांच्या पुस्तकाला ‘नरकातला स्वर्ग’ हे नाव कोणी सूचवलं माहितीये? जाणून घ्या सविस्तर…

Saturday, 17 May 2025, 22:38

भयंकर..! साडेपाच वर्षाच्या मुलीचे अपहरण, ऊसाच्या शेतात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न, दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीला अटक

Saturday, 17 May 2025, 21:00

बनावट मृत्युपत्र तयार करून मालमत्ता हडप करण्याच्या प्रयत्नातील आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

Saturday, 17 May 2025, 20:13

गावठी बनावटीच्या दारुची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यास लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Saturday, 17 May 2025, 19:30
Next Post
man looses money after opening PM kisan Link yavatmal

'पीएम किसान'ची लिंक ओपन करताच शेतकऱ्यांच्या खात्यातून रक्कम झाली बेपत्ता; रक्कम काढून घेतल्यावरही ओटीपीचे मेसेज

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.