मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावलं आहे. यामध्ये आमदार रवींद्र वायकर यांना 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेत. 500 कोटींच्या कथित हॉटेल गैरव्यवहाराप्रकरणी रवींद्र वायकर यांना हे समन्स बजावण्यात आले. दरम्यान, वायकर यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना आपल्याला अशा कोणत्याही प्रकारचं समन्स आलं नसल्याचं म्हटलं आहे. तसेच जर कोणतीही समन्स आलं, तर चौकशीला हजर राहणार असल्याचं देखील रवींद्र वायकर म्हणाले.
जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणी आमदार रवींद्र वायकर यांच्यावर सप्टेंबरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये रवींद्र वायकर यांनी यापूर्वीच कोर्टाकडून अटकपूर्व जामीन घेतला आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी आहेत, त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा: