Ratan Tata Pet Dog: उद्योगपती रतन टाटा यांचे (दि. 09 ऑक्टोबर) रोजी निधन झाले. यानंतर त्यांच्या ‘गोवा’ नावाच्या कुत्र्याची देशभरात चर्चा होत आहे. अशातच सोशल मीडियावर आता एक हॉट्सअॅप मेसेज व्हायरल होतो आहे. यात पोस्टमध्ये गोवा श्वानानेही जीव सोडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यावर मुंबई पोलिसांनी व्हायरल मेसेजची दखल घेतली आहे.
सोशल मीडियावर एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे. यात म्हटलं आहे की, ‘रतन टाटा यांच्या ‘गोवा’ नावाच्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. ही दु:खद बातमी आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर 3 दिवसांनी ‘गोवा’ या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला आहे.’
काय म्हटलं मुंबई पोलिसांनी?
मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रतन टाटा यांचा पाळीव कुत्रा गोवा याच्या मृत्यूची बातमी अफवा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हॉट्सअॅप मेसेज हा खोटा आहे. रतन टाटा यांचा कुत्रा ‘गोवा’ हा जिवंत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सुधीर कुडाळकर यांनी टाटांचा जवळचा सहकारी शांतनू नायडूला संपर्क केला. त्याने गोवाच्या तब्येतीबाबत विचारणा केली. सुधीर यांनी विचारणा केल्यानंतर शांतनूने त्यांना उत्तर दिलं आहे. गोवा एकदम ठीक असून चिंता करु नका, ही एक फेक न्यूज आहे, असं त्याने म्हटलं आहे. त्यानंतर सुधीर यांनी इन्स्टाग्राम रील पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी लोकांना खोट्या माहितीपासून सावध राहा. तसेच खातरजमा केल्याशिवाय अशा पोस्ट कुणीही व्हायरल करू नयेत असे आवाहन केले आहे.
View this post on Instagram