मनोरंजन : प्रसिद्ध चित्रपट निर्माते राकेश रोशन यांना १६ जुलै रोजी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांची प्रकृती इतकी बिघडली की डॉक्टरांना त्यांना आयसीयूमध्ये ठेवावे लागले. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे.

राकेश रोशन यांची मुलगी सुनैना रोशन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, तिच्या वडिलांच्या मानेवर अँजिओप्लास्टी झाली आहे. यासोबतच सुनैना यांनी असेही म्हटले की वेळेवर उपचार मिळाल्याने ते आता पूर्णपणे बरे आहेत.
राकेश रोशनच्या कुटुंबातील सर्व सदस्य रुग्णालयात त्यांच्यासोबत आहेत. हृतिक रोशन, हृतिकची मैत्रीण सबा आझाद आणि मुलगी सुनैना रुग्णालयात उपस्थित आहेत व त्यांची काळजी घेत आहेत.
दरम्यान, हृतिकच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सच्या ‘वॉर २’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात चाहते पुन्हा एकदा ऋतिकचा अॅक्शन अवतार पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्याच्यासोबत कियारा अडवाणी आणि ज्युनियर एनटीआर दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.







