मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. स्वत: जरांगे यांनी यासंदर्भातील घोषणा करुन आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले. त्यावर आता राज ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रीया दिली आहे. आता फक्त आरक्षण कधी मिळणार? हे एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा अशी गंभीर बाब त्यांनी ट्विटच्या माध्यमातून मांडली आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांनी सकाळी ज्यूस पाजून जरांगेंचे उपोषण सोडले. राज्यात जल्लोष करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत ‘मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन… सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. आता फक्त आरक्षण मिळायचे बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधव भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल’, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही…
— Raj Thackeray (@RajThackeray) January 27, 2024
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मराठा समाजाच्या पाठिशी सरकार उभं असून, मराठा समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणार असं आश्वासन शिंदेंनी दिले आहे. आरक्षण मिळेपर्यंत ओबीसींच्या शैक्षणिक सवलती मराठ्यांना मिळतील. तसेच सगे सोयऱ्यांबाबत अध्यादेश काढला जाईल. नोंदी मिळणा-यांना प्रमाणपत्र दिले जातील अशी माहिती मुख्यमंत्र्य़ांनी दिली.