मुंबई: टोलवर कायमच आक्रमक भूमिका घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पुन्हा टोलनाक्यावर झालेली गर्दी पाहून स्वत: रस्त्यावर उतरून वाहनांची गर्दी कमी केली. यावेळी टोल नाक्यावर झालेली गर्दी पाहून राज ठाकरे यांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांची सुद्धा चांगलीच खरडपट्टी केली.
शुक्रवारी नाशिक दौऱ्यातही ठाकरे यांनी टोलचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यातच नाशिक दौरा आटोपून राज ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना ठाणे टोलनाक्यावर मोठ्या संख्येने गाड्या ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या. त्यामुळे वाहनधारकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः राज ठाकरे टोलनाक्यावर गेले. यावेळी अडकलेल्या शेकडो वाहनांना रस्ता करुन दिला आणि आपल्या ठाकरे शैलीत सज्जड दम दिला.
आज नाशिक दौरा आटोपून मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना ठाणे टोलनाक्यावर हजारोंच्या संख्येने गाड्या रांगेत ट्रॅफीकमध्ये अडकल्या होत्या. लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः मा.राजसाहेब ठाकरे नेहमी प्रमाणे टोलनाक्यावर गेले, अडकलेल्या लोकांना रस्ता… pic.twitter.com/WdexyP7jnE
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 2, 2024