मुंबई: आमदार अपात्रता प्रकरण निकालासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. आज कुणाच्याच विरोधात निर्णय लागणार नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवण्यात येणार नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. या दोन्ही गटांनी सुप्रीम कोर्टात जाऊन फैसला करावा, अशा निर्णयाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता मिळण्याची शक्यता
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काही तासात घेणार आहेत. त्या आधीच सूत्रांनी ही माहिती दिली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यात येणार नाही. त्यामुळे दोन्ही गटांना काही आक्षेप असेल तर त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मूभा असेल. त्याचवेळी शिंदे गटाला अधिकृतपणे शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्यात येणार आहे अशीही खात्रीलायक माहिती मिळत आहे.