मुंबई : भाजपकडे आता अन्य राज्यात पक्ष वाढण्यासारखी परिस्थिती नाही, म्हणून त्यांचे महाराष्ट्रवर लक्ष आहे. यातून फोडाफोडीचे प्रयोग सुरू झाले. यातील पहिला प्रयोग शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीवर झाला. आता विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. कायद्याला धरून निर्णय असणार आहे, सोडून निर्णय झाला तर सर्वोच्च न्यायालय काय करणार? हे पहावे लागेल. असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ते सांगलीत बोलत होते.
शिवसेना फोडून भागणार नाहीं म्हणून राष्ट्रवादी फोडली. हे प्रयोग करणे थांबतील असे वाटत नाही. नेते हे वैयक्तिक स्वार्थासाठी गेलेत, जनतेला ही गदारी आवडली नाही, फितुरी आवडलेली नाही. अषी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पक्षाआंतर्गत बंदी कायदा हा कुचकामी कायदा, कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यावा लागेल, त्यामुळे पहिला भूकंप हा नार्वेकर काय करतील हा असेल. असे स्पष्ट मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
यावेळई त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांवरही भाष्य केलं. लोकसभा आणि विधानसभा निवडणूका कदाचित एकत्र होतील, भाजपच्या लोकसभेच्या जागा वाढतील अशी परिस्थिती देशात नाही, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे भाजपची रणनीती ओळखणे गरजेचं आहे. जर तिसऱ्यादा मोदी पंतप्रधान झाले तर देशाची घटना संपवून टाकण्याची भीती आहे, अशी टीका त्यांनी केली.