मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची वायबीचव्हाण सेंटर येथे भेट झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आलं आहे. इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाच्या पार्श्वभूमीवर आजच्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. अद्यापही वंचित बहुजन आघाडीचा अद्याप इंडिया आघाडीत समावेश झालेला नाही. खासदार शरद पवारांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री पदही कंत्राटावर द्या, असं म्हणत आंबेडकरांनी निशाणा साधला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रॉब्लेस्म ऑफ रुपी प्रबंधाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या विनंतीनंतर प्रकाश आंबेडकर हे शरद पवार यांच्या भेटीला गेलं. त्यावेळी काही वेळ शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये चर्चाही झाली.