मुंबई : लोकसभा निवडणूका जायीर झाल्या असल्या तरी जागावाटपाचा तिढा महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कायम आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाने 20 तर काँग्रेसने 7 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर काँग्रेसच्या एका उमेदवाराला प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा जाहीर केला आहे, पण दुसरीकडे त्यांनी महाविकास आघाडीला मात्र 26 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.
कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराजांच्या कुटुंबातून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. आम्ही पक्ष आणि आमची आयडोलॉजी म्हणून फुले, शाहू आणि आंबेडकर अशी भूमिका घेत असतो. त्यामुळे शाहू महाराजांची विचारसरणी आणि चळवळीच्या जवळचं कुटुंब मानतो. वंचित बहुजन पक्षाकडून त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते सर्व प्रयत्न पक्षाच्या वतीने केले जातील. मागच्यावेळी जे घडलं होतं, ते या वेळेस घडू नये म्हणून दक्षताही त्याठिकाणी घेण्यात येईल, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी नव्या पक्षाची नोंदणी केली आहे. त्यांनी एक यादी आमच्या पक्षाकडे सादर केली आहे. सध्या आमचे घोंगड भिजत आहे. त्यामुळेआम्ही फायनल काही ठरु शकत नाही. त्यामुळे पुढील चर्चा कायम राहिल, असं आम्ही ठरवले आहे. 10 जागांवरुन शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये वाद आहे. पाच जागांवर तिन्ही पक्षांमध्ये टाय आहे”, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.