मुंबई : येथील कांदिवलीमधील एका शाळेतील 13 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai: Police have registered a case against a teacher of a school located in the Kandivali area for molesting an 11-year-old student. Police have called the accused to record his statement and the statements of the principal and the girl’s parents have also been recorded. The…
— ANI (@ANI) August 16, 2024
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने बुधवारी (14 ऑगस्ट 2024) शाळेच्या मुख्याध्यापकांना घटनेची माहिती दिल्यानंतर शिक्षकाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलीने मुख्याध्यापकांना सांगितलं की, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस जेव्हा वर्ग संपला तेव्हा त्या मुलीला शाळेतील एका शिक्षकांने वर्गाबाहेर बोलावून घेतलं आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत राहिला. यानंतर मुख्याध्यापकांनी पोलीस स्टेशनमध्ये जावून पीडित विद्यार्थीनीच्या तक्रारीवरुन पोक्सो अॅक्ट अंतर्गत शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
आम्ही मुख्याध्यापक आणि मुलीच्या पालकांचे जबाब नोंदवले असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत. आरोपांची सत्यता शोधण्यासाठी आम्ही शाळेतील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासत आहोत, असे कांदिवली पोलिसांनी सांगितले. दरम्यान, कांदिवली पोलीसांनी संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना जुलै महिन्याच्या अखेरीस घडली. परंतु, इतक्या दिवस पीडिताने याबाबत कोणालाही कसे सांगितले नाही, आरोपी शिक्षकाने तिला कोणत्या प्रकारची धमकी दिली होती का? याचाही तपास केला जात आहे.