मुंबई: राज्यात 17 हजार पोलीस शिपाई भरतीला सुरुवात झाली आहे. या पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. परंतु, आता राज्य शासनाने या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मुदतवाढ दिली आहे. महाराष्ट्रात नव्याने मंजूर झालेल्या मराठा आरक्षणातील SEBC आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी उशीर होत असल्यामुळे सरकारने ही मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता नव्या आदेशानुसार इच्छुक उमेदवारांना 15 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज करता येणार आहे. राज्य शासनाने 31 मार्चपर्यंत असलेली मुदत वाढवत 15 एप्रिल केली आहे. या मुदतवाढीचा फायदा लाखो उमेदवारांना होणार आहे. याबाबत राज्य सरकारने प्रेसनोट प्रसिद्ध करत माहिती दिली आहे.