मुंबई : राज्यातील पोलीस कारवाईची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मानखुर्दमध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत ७ लाख १० हजाराच्या भारतीय बनावट नोटां पकडल्या आहेत तसेच चार जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द महामार्गावर काही जण भारतीय बनावट नोटा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एका कारमधून ७ लाख १० हजारांच्या बनावट नोटा जप्त केलेल्या आहेत. आरोपींकडे १००, २०० आणि ५०० च्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी शहानवाज आयुब शिराळकर ५० वर्षे, राजेंद्र आत्माराम खेतले ४३ वर्षे, संदीप मनोहर निवाळकर ४० वर्षे, ऋषिकेश रखुनाथ निवाळकर २६ वर्षे. यांना अटक केली आहे. आरोपींनी या नोटा कुठून आणल्या? त्या कुठे वितरीत केल्या जाणार होत्या? याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणी मानखुर्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.