मुंबई : आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरच्या प्रसादामध्ये तूपाऐवजी जनावरांची चरबी वापरण्यात आली असल्याची घटना समोर आली होती. लाडूच्या प्रसादामध्ये भेसळ केल्याच्या घटनेमुळे सध्या देशभरामध्ये संतापाची लाट निर्माण झाली असताना आता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाचा मुद्दा सुद्धा समोर आला आहे. सिद्धिविनायकाच्या प्रसादाचा हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर आला असून प्रसादामध्ये देण्यात येणाऱ्या लाडूच्या पाकिटामध्ये उंदीर आढळून आले आहेत. त्याचा व्हिडीओ सद्या व्हायरल होत आहे.
अधिक माहिती अशी की, सिद्धिविनायक मंदिराबाबत भाविकांना हादरवून टाकणारी गोष्ट समोर आली आहे. भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडूमध्ये उंदिर आढळून आले आहेत. प्रसादासाठी देण्यात येणाऱ्या लाडूच्या ट्रेमध्ये उंदरांची पिल्ले आढळून आली आहेत. या उदरांनी लाडूची पाकिटं अक्षरश: कुरतडून त्यामधील लाडू खाल्ल्यांचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. लाडूच्या ट्रेमध्ये उंदराची ७ ते ८ पिल्लं या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
मध्यंतरीच्या काळात अनेक गैरव्यवहाराचे आरोप तत्कालिन सिद्धीविनायक न्यास मंडळावर आणि तत्कालिन कार्यकारी अधिकारी यांच्यावर करण्यात आले होते. कायम चर्चेत राहणारे सिद्धिविनायक मंदिर आता या लाडूच्या प्रसादामुळे आता पुन्हा चर्चेत आले आहे. प्रसादामध्ये उंदराची पिल्ले आढळून आल्याचा व्हिडीओ पाहून भाविकांना मोठा धक्का बसला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणालाही किळस आल्याशिवाय राहणार नाही. या घटनेवरून आता संताप व्यक्त करण्यात येत आहे.