मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांनी २० तारखेला मुंबईत आंदोलन करू नये यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आज दुपारी २ वाजता सुनावणी होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. मनोज जरांगेंनी मुंबईत येऊन आंदोलन करू, नये अशी मागणी या याचिकेतून केली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने तातडीने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा २० जानेवारीला मुंबईत येऊन मोठं आंदोलन करू, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.