मुंबई : विधान परिषदेने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाचे T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन करण्याचा ठराव मंजूर केला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हा ठराव वाचून दाखविला.
दरम्यान, भारतीय खेळाडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार असल्याची माहिती शिवसेनेच्या एका नेत्याने दिली आहे. फलकाचा फोटो दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
आमदार रोहित पवार यांनी या फलकाचा फोटो दाखवत सत्ताधारी यांना फलकबाजी करण्यातच जास्त इंटरेस्ट आहे. तसेच टीम इंडिया ही सर्वांची आणि देशाची आहे. त्यामुळे स्वतःचे फलक लावण्यात सत्ताधाऱ्यांनी समाधान मानले. टीम इंडियाचे फोटो वापरून खाली सत्ताधारी आणि विरोधकांचे नाव वापरले असते, तर अधिक चांगला संदेश गेला आसता. मात्र, सत्ताधाऱ्यांना फलकबाजी करण्यातच आनंद वाटतो, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
सत्ताधारी आमदाराने अशा पद्धतीने पोस्टर लावले आहेत, की त्या पोस्टरवरून इंडियन टीमच गायब आहे.’लाडकी बहीण’ पोस्टरवर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या आमदारांचे फोटो लावले आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याची सवय सत्ताधाऱ्यांना लागली आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला.