मुंबई : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे गेल्या नऊ दिवसांपासून जालन्याच्या वडीगोद्री येथे उपोषण सुरू आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. या पार्शवभूमीवर सरकारच्या शिष्टमंडळाने आज लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये मंत्री गिरीश महाजन उदय सामंत आणि अतुल सावे हे मुंबईला जाणार आहे. त्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांचे शिष्टमंडळ देखील असणार आहे.
दरम्यान, सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांना भेटून गेल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सत्तेचा गैरवापर करून चुकीची सर्टिफिकेट दिली आहेत का? त्याची चौकशी करावी आणि राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट घ्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी या दोन मागण्या असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे…
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 21, 2024
ओबीसींच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत. शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखे होईल अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास आहे, असं पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे.