मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभा निवडणुकांसाठी तिसरी यादी जाहीर केली आहे. ऑफिशिअल ट्विटर हँडलवर पोस्ट करत ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक 2024 ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि स्वाभिमानी विचारांचा वारसा प्रखर करूया!”
तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि… pic.twitter.com/XUHuXOh88P
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 10, 2024
;
दरम्यान माढा लोकसभेसाठी अजूनपर्यंत उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. खासदार शरद पवार यांच्याकडून उमेदवारांची अजूनही चाचपणी करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांचे सध्या सर्वात आघाडीवर आहे. भाजपकडून मोहिते पाटील उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहेत, ते लवकरच तुतारी हातात घेणार असल्याची जोरदार चर्चा सोलापूर जिल्ह्यात सुरु आहे. आगामी दोन दिवसांत याबाबतचा निर्णय जाहीर होणार आहे. मोहिते पाटील पूर्वी हे शरद पवार यांच्याबरोबरच होते, त्यामुळे ते स्वगृही परतल्यास त्यांना उमेदवारी मिळू शकते.
साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यामुळे साताऱ्यासाठी शरद पवार यांच्याकडून आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाकडून देखील साताऱ्यात उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही, पण खासदार उदयनराजे यांचे नाव जवळपास निश्चित झालेले आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्याकडून आमदार खडसेंना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरु होत्या. पण, एकनाथ खडसे यांनी नकार दिला. त्यामुळे शरद पवारांकडून श्रीराम पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. रावेरमधून भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता रावेर मतदारसंघात रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील अशी लढत होणार आहे.