मुंबई : माजी मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली आहे. प्रकृती बिघडल्याने त्यांना कुर्ला येथील क्रिटिकेअर सेंटर रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं आहे. नवाब मलिक नेमकं कोणत्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली आहे. सध्या ते वैद्यकीय कारणामुळे जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहे. शनिवारी दुपारी नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याची माहिती त्यांची मुलगी सना मलिक हिने दिली. त्यानंतर त्यांना कुर्ला येथील रुग्णालयात आप्तकालीन कक्षात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे.