मुंबई: बोरिवली (Borivali) येथे एक तरुणी शेअर रिक्षातून (Share rickshaw) प्रवास करत असताना तिच्यासोबत असलेल्या दुस-या प्रवाशाने तिचा विनयभंग (Molestation)करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेली तरुणी बचावासाठी चालत्या रिक्षातून रस्त्यावर उडी मारली. यावेळी ती तरुणी किरकोळ जखमी झाली आहे.
यावेळी घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पश्चिमेकडील पोईसर येथून एक 29 वर्षाची तरुणी रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी शेअर रिक्षातून निघाली होती. यावेळी त्या शेअर रिक्षात आधीच एक प्रवासी बसलेला होता. यानंतर ही रिक्षा बोरिवली रेल्वे स्थानकाकडे निघाली. मात्र, इतक्यात तरुणीच्या लक्षात आलं की शेजारी बसलेला व्यक्ती तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यादरम्यान तरुणीने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं.
शेअर रिक्षात बसलेल्या त्या प्रवाशानी पुन्हा पुन्हा तिला स्पर्श करत होता. यावेळी त्या तरुणीने ही माहिती रिक्षाचालकाला सांगितली, परंतु रिक्षाचालकाने या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. त्याक्षणी तरुणीने रिक्षा थांबविण्यास सांगितलं. मात्र, रिक्षा चालकाने रिक्षा थांबवली नाही. मग तरुणीने मदतीसीठी आरडाओरड केली. तिने बचावासाठी धावत्या रिक्षातून उडी मारली. रिक्षातून उ़डी मारल्यामुळे तरुणी किरकोळ जखमी झाली आहे.