Mumbai News : मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यात ठिकठिकाणी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. त्याचवेळी वादग्रस्त आणि टोकाच्या वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या अलिशान गाडीच्या काचा फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतल्या हिंदमाता परिसरातील क्रिस्टल टॉवर्स येथे हा प्रकार घडला. गाडी फोडणारे एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत होते. पोलिसांनी या प्रकरणी तीन तरुणांना अटक केली आहे. आता प्रसिद्ध वकिल सतीश मानशिंदे हे गुणरत्न सदावर्ते वाहन तोडफोड प्रकरणात अटक झालेल्या मराठा तरुणांचा खटला लढवणार आहेत. विशेष म्हणजे एकही पैसा न घेता ते मोफत हा खटला लढणार आहेत.
गुणरत्न सदावर्ते वाहन तोडफोड प्रकरणाचा खटला मोफ़त लढवणार
सतीश मानशिंदे हे प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर म्हणून ओळखले जातात. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या केस लढवल्यामुळे मानशिंदे या नावाचा कायद्याच्या क्षेत्रात दबदबा आहे. (Mumbai News) मानशिंदे यांनी १९८३ साली वकिली पेशाला सुरुवात केली. राम जेठमालानी यांच्याकडे त्यांनी काम केले आहे. कर्नाटक विद्यापीठातून लॉ कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली आहे. मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात अभिनेता संजय दत्तचे वकीलपत्र मानशिंदे यांनी घेतले होते.
हिट अँड रन प्रकरणात अडकलेला दबंग सलमान खानचा खटला २००२ साली ते लढले आणि त्यांनी सलमानला जामीन मिळवून दिला. सतीश मानशिंदे हे अनेक हाय-प्रोफाईल प्रकरणात वकील होते. (Mumbai News) आता त्यांनी मराठा आंदोलन प्रकरणात शिरकाव केला आहे. एवढेच नव्हे तर मराठा आंदोलकांचा खटला ते निशुल्क लढणार आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : विमानात बसला, छातीत दुखतंय म्हटला; इमर्जन्सी लँडिंग होताच भलतंच बोलला
Mumbai News : पुणे पोलिसांकडून माझ्या जिवाला धोका… ललित पाटीलचा कोर्टात खळबळजनक दावा