मुंबई : पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकात तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे चर्चगेटच्या दिशेने धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. गाड्या 15-20 मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे.
पश्चिम मार्गावरील रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकामध्ये केबल तुटल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याचे सांगितलं जात आहे.
बोरीवलीतील फलाट क्रमांक 1 आणि 2 वरील सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर अतिरिक्त ताण आला आहे.