मुंबई : येथील IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्यरात्री 3 च्या सुमारास ही घटना घडली आहे. मंत्रालयासमोरील सुनीती नावाच्या इमारतीवरुन उडी मारुन तिने आत्महत्या केली आहे.
IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने 10 मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. ती खाली उभ्या असलेल्या बाईकवर कोसळल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या आत्महत्येमागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. या घटनेने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
यावेळी मृत झालेली मुलगी LLB चे शिक्षण घेत होती. ती 27 वर्षांची होती. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती आहे. त्यातून काही माहिती समोर येऊ शकते. तिचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला आहे. घटनास्थळी कफ परेड पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित आहे. IAS अधिकारी विकास रस्तोगी शिक्षण विभागात सचिव आहेत तर त्यांच्या पत्नी राधिका रस्तोगी चलन विभागात सचिव आहेत.