मुंबई : राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या स्थगितीच्या विरोधात युवा सेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणावरुन शनिवारी (दि. २१) सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका देत ही उद्याच ही निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच घ्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर सुरक्षा व इतर प्रशासकीय यंत्रणांसाठी मुंबई विद्यापीठाने वेळ मागितला होता. त्यामुळे आता मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक 24 सप्टेंबरला होणार असून 27 सप्टेंबर रोजी निकाल लागणार आहे.