मुंबई : गेल्या सहा तासांमध्ये मुंबईत 300 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुढील तीन ते चार तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे.
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले, पण त्यासोबतच सोशल मीडियावर विनोदाची लाटही आली. या पावसामुळे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोमवारी सकाळपासूनच एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #MumbaiRains ट्रेंड सुरु आहे.
Mumbaikars going to the office pic.twitter.com/AS6LXNwT3D
— Abhishek (@MSDianAbhiii) July 8, 2024
Wake up babe, It is time to post #MumbaiSpirit drafts. #MumbaiRain pic.twitter.com/PM0jjsQz7P
— Alok Shinde (@alokshinde) July 8, 2024
Mumbaikar going to office today. #MumbaiRains pic.twitter.com/6fTNzb7awT
— Godman Chikna (@Madan_Chikna) July 8, 2024
When it’s raining heavily, but you have got the instructions to reach office on time #MumbaiRains pic.twitter.com/VjCWgNlG9A
— Ishu ❤️🔥 (@iamishiita__) July 8, 2024
#MumbaiRains
Mumbaikar during rain going to office:
Ghar se nikalte hi Kuch dur chalte hi pic.twitter.com/SMafoG1Pra— Abdullah (@abdul_tweets03) July 8, 2024
दरम्यान, मुंबईतील समुद्रात आज दुपारी 1.57 मिनिटांनी उंचच उंच लाटा उसळणार आहेत. मुंबईतील समुद्रात साधारण ४.४० मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याचे दिसत आहे. सध्या चर्चेगेट, दादर, लालबाग, सीएसटी, कुर्ला, घाटकोपर, अंधेरी या भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.