Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai : डॉ. सोमनाथ गिते यांना राज्य सरकारचा मानाचा ‘महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार’ प्रदान! पुरस्काराची रक्कम शाळेला दान करत जपली सामाजिक बांधिलकी!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 28 March 2026, 13:18
Mumbai

photo- ppn

Mumbai : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिला जाणारा सन 2021-22 या वर्षाचा मानाचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ डॉ. सोमनाथ वेणूताई निवृत्ती गिते यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे पार पडलेल्या दिमाखदार समारंभात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सोहळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे, कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

 

व्यसनमुक्ती चळवळीत डॉ. गिते यांनी केलेल्या उल्लेखनीय व प्रभावी कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना बहाल करण्यात आला. समाजजागृती, मार्गदर्शन आणि जनप्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना व्यसनाच्या अंधःकारातून बाहेर काढत नवजीवन दिले आहे. या पुरस्कारामध्ये रोख रक्कम, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ यांचा समावेश आहे. त्यांच्या या यशाबद्दल राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ. गिते यांचे कार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही गौरवले गेले असून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्स, लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या कार्याची नोंद झाली आहे. व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, सेवादूत पुरस्कार आणि राष्ट्रीय युवा आयकॉन पुरस्कार यांसारख्या सन्मानांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

“व्यसनामुळे उद्ध्वस्त होत असलेली अनेक कुटुंबे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली, त्यांच्या वेदना जवळून अनुभवल्या… आणि त्यातूनच मनात ठाम निर्धार निर्माण झाला की समाजासाठी काहीतरी करायलाच हवे. त्या भावनेतूनच व्यसनमुक्तीच्या कार्याची सुरुवात केली. गेली अनेक वर्षे या क्षेत्रात काम करत असताना अनेकांना व्यसनाच्या अंधःकारातून बाहेर काढून नवजीवन देण्याचा प्रयत्न केला, हीच माझी खरी कमाई आहे.

हा पुरस्कार केवळ माझा नसून त्या प्रत्येक व्यक्तीचा आहे, ज्यांनी व्यसनावर मात करून नव्याने आयुष्य उभारले. त्यांच्या जिद्दीला आणि नव्या सुरुवातीला हा सन्मान अर्पण आहे. या पुरस्कारामुळे माझ्यावरची जबाबदारी अधिक वाढली असून, पुढेही अधिक समर्पणाने आणि जिद्दीने कार्य करत राहीन.

तसेच, या पुरस्काराची संपूर्ण रक्कम आणि तितकीच माझ्या वतीने भर घालून स्वर्गीय आई वेणूताई यांच्या स्मरणार्थ शाळेसाठी देणगी देत आहे. तिच्या संस्कारांचीच ही प्रेरणा आहे,” असे डॉ. गिते यांनी भावनिक शब्दांत सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

केस लढवण्याच्या बहाण्याने बोगस वकील बनून महिलेची तब्बल 2 लाखांची फसवणूक; गौरी वांजळेवर कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.