Mumbai Crime News : मुंबईतील मालाडमधून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एकाने आपल्या पत्नीला संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. सात डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे.
मोईनुद्दीन अन्सारी असं आरोपी पतीचं नाव असून परवीन अन्सारी असे त्याच्या मृत पत्नीचे नाव आहे. मुंबईतील मालाड ते जोगेश्वरी रेल्वे स्थानकादरम्यानच्या झोपडपट्टीत ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गुरुवारी सात डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गोरेगाव ते मालाड रेल्वे स्थानकादरम्यान एका झोपडीत राहणाऱ्या एका दारुड्या व्यक्तीने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच बोरिवली जीआरपीने हत्येअंतर्गत गुन्हा दाखल करून अवघ्या चार तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. (Police Arrested Accused )
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे मार्गाच्या जोगेश्वरी ते मालाड दरम्यान असणाऱ्या रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्टीत आरोपी मोईनुद्दीन अन्सारी आणि परविन अन्सारी मागील अनेक वर्षापासून राहत होते. परविन अन्सारी ही महिला काबाडकष्ट करून पैसे कमवून आपल्या पतीसोबत संसार करत होती.
मात्र मोईनुद्दीन अन्सारी याला दारूचे व्यसन असल्याने त्यांच्यात सातत्याने वाद भांडणे होत असत. गुरुवारी त्याने तिला दारू पिण्यास पैशे मागण्यास सुरुवात केली. मात्र, तिने त्याला नकार दिला. या नकाराने संतापलेल्या आरोपी मोईनुद्दीनने तिला लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा जीव गेला.