मुंबई : मुंबईतील मानखुर्द येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 12 वर्षीय मुलावर दारूच्या नशेत एका व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
शरद साबळे असे आरोपीचे नाव असून तो स्थानिक रहिवासी आहे.
घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा हा भाजी खरेदी करण्यासाठी गेला असता आरोपी शरद साबळेने त्याला मानखुर्दच्या सोनापूर येथील निर्जळस्थळी घेऊन गेला आणि त्याच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडित मुलाने घरी परतल्यानंतर त्याच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार त्याच्या कुटुंबाना सांगितला. पीडिताच्या कुटुंबाने तात्काळ मानखुर्द पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेतला असता तो मद्यधुंद अवस्थेत फिरताना दिसला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शरद साबळे हा मानखुर्द येथील रहिवाशी असून तो नेहमी दारूच्या नशेत असतो, अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे. घटनेच्या दिवशीही आरोपी शरद साबळे हा नशेतच होता, असे वैद्यकीय अहवालातून निष्पन्न झाले आहे.