मुंबई: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (दि. 28) दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. पवार यांनी 2024-25 वर्षासाठीअतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला आहे. या अतिरिक्त अर्थ संकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा अजित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या योजनेची चर्चा होती. मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना महाराष्ट्रात लागू करण्यात येणार आहे.
योजनेत किती निधी मिळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये प्रदान करण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एक जुलै 2024 पासून ही योजना लागू करण्यात येईल” असं अर्थमंत्री अजित पवार म्हणाले.