Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेमापोटी फुटला MPSC चा पेपर! संशय येऊ नये म्हणून १० प्रश्न मुद्दाम चुकवण्याचा होता प्लॅन; खळबळजनक माहिती समोर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 28 August 2026, 10:30

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेपरफुटीचे रॅकेट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चालवण्यात आल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे. परीक्षेत सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्यास संशय निर्माण होऊ शकतो, या भीतीने उमेदवार ऋतुजा पाटीलला तब्बल दहा प्रश्न मुद्दाम चुकीचे सोडवण्याचा सल्ला देण्यात आला होता. यासंदर्भातील व्हॉट्सॲप चॅट्स पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे.

तपासात आरोपींकडून तब्बल २९४ प्रश्नांची यादी तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यापैकी ७७ प्रश्न परीक्षेत अगदी त्याच स्वरूपात आले होते. या प्रश्नांसोबत अपेक्षित गुणांची नोंदही करण्यात आली होती. त्यामुळे परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका मिळाल्याचा संशय अधिक बळावला आहे. उमेदवाराने सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊ नयेत, यासाठी करण्यात आलेल्या सूचनांमुळे पेपरफुटीचा प्रकार किती काळजीपूर्वक आखण्यात आला होता, हेही समोर आले आहे.

या प्रकरणात ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्या प्रेमसंबंधामुळे पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आल्याची माहिती आहे. तपासानुसार, ऋतुजाचे वडील अमृत पाटील यांनी परीक्षेच्या दोन दिवस आधी दलाल प्रवीण पाटीलच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका मिळवल्याचा आरोप आहे. त्यानंतर ऋतुजाने ही प्रश्नपत्रिका प्रेमापोटी गौरव पाटीललाही दिल्याचे तपासात समोर आले आहे.

परीक्षेनंतर ऋतुजा उत्तीर्ण होऊन औषध निरीक्षक पदासाठी पात्र ठरली. मात्र, पुढे ऋतुजा आणि गौरव यांच्यात वाद होऊन दोघांचे संबंध तुटले. त्यानंतर गौरवने एमपीएससीकडे ऋतुजाविरोधात तक्रार केली. काही काळाने त्याने पुन्हा आयोगाला ई-मेल करून आपण मुद्दाम पेपरफुटीचा बनाव केल्याचे सांगितले. त्यामुळे त्याच्या भूमिकेबाबतही पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. गौरवला पोलिसांनी अटक केली असून ऋतुजाला नोटीस बजावण्यात आली आहे. तिच्यावर अद्याप अटकेची कारवाई झालेली नाही.

 

दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यात एमपीएससीचे अप्पर सचिव अभिजीत लेंडवे यांच्यासह आयोगातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

पेपरफुटीच्या तक्रारीनंतर आयोगाने २२ मार्च २०२६ रोजी झालेली औषध निरीक्षक गट-ब पदाची चाळणी परीक्षा आणि त्यासंबंधित संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या पदासाठी फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून त्यांच्याकडून फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. फेरपरीक्षेची तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात राजकीय विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी घरातील महिलेची केली हत्या; दोघांना जन्मठेपेची शिक्षा

Friday, 28 August 2026, 11:20

‘दादा आज तू नाही पण…’ अजितदादांच्या निधनानंतरचं पाहिलं रक्षाबंधन; दादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे यांची डोळे पाणावणारी पोस्ट

Friday, 28 August 2026, 11:00

तिने अंतर्वस्त्रात लपवली चिठ्ठी अन् केली आत्महत्या; भाजप नेत्याच्या सुनेने ‘या’ कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल; पोस्टमार्टमवेळी उलगडलं गूढ

Friday, 28 August 2026, 10:59

जरांगे म्हणत होते, अखेर तेच झालं! ‘कुणबी’चे पिढ्यान्‌पिढ्यांचे पुरावे, तरी जात वैधता नाकारली; आरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह

Friday, 28 August 2026, 10:43

प्रेमापोटी फुटला MPSC चा पेपर! संशय येऊ नये म्हणून १० प्रश्न मुद्दाम चुकवण्याचा होता प्लॅन; खळबळजनक माहिती समोर

Friday, 28 August 2026, 10:30

मागून आला अन् चाकूने केले सपासप वार! पुण्यात महिला अन् चिमुकल्यासमोर तरुणाची निर्घृण हत्या

Friday, 28 August 2026, 10:03
Next Post

जरांगे म्हणत होते, अखेर तेच झालं! ‘कुणबी’चे पिढ्यान्‌पिढ्यांचे पुरावे, तरी जात वैधता नाकारली; आरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp