मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेणाऱ्या येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात या परीक्षा घेण्यात येणार होत्या. मात्र, आता या परीक्षा नंतर होणार आहेत. या परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे सांगण्यात आले.
येत्या 28 एप्रिल रोजी ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024’ तर 19 मे रोजी ‘समाज कल्याण अधिकारी गट ब’, ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब’ या परीक्षा होणार होत्या. मात्र, आता या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या जातील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, त्याबाबत कोणतीही घोषणा आयोगाकडून आतापर्यंत करण्यात आलेली नव्हती. आता आरक्षणाचे कारण पुढे करत राज्य लोकसेवा आयोगाने एप्रिल आणि मेमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांसाठी अधिनियम
सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांसाठी अधिनियम 2024 मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर परीक्षांबाबत घोषणा केली जाणार स्पष्ट करण्यात आले आहे.