मुंबई : ‘कुटुंब एकीकडे आणि राजकारण दुसरीकडे’ हे पवार कुटुंबीय अनेकदा सांगत आले आहेत. जरी पवार कुटुंबीयांकडून असे सांगण्यात जरी येत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी कधीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली नाही. अजित पवारांच्या प्रश्नावर त्यांनी कायम मौन बाळगले आहे. त्यामुळे खरी फूट पडली आहे का? असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना नेहमी पडत असतो. आता गुरुवारी सुप्रिया सुळेंनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अनेकांच्या भुवया उंचवल्या आहे. माझी लढाईही अजित पवार गटांसोबत नाही, असे सुप्रिया सुळेंनी वक्तव्य करताच राजकीय चर्चंना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला. या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी लढाईही फक्त भारतीय जनता पक्षाविरोधात आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटांसोबत नाही. तसेच सुनेत्रा पवार यांचे लागलेले बॅनर मी नाही पाहिले नाही, असंही सुळे म्हणाल्या.
ललित पाटील प्रकरणावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ड्रग्जच्या बाबतीत कोणही राजकराण करू नये. माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी ड्रग्जची भंडाफोड केली पाहिजे. ड्रग्ज विरोधात राज्य सरकारने कडक कारावाई केली पाहिजे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा:
Daund News : दौंड नगरपरिषदेच्या प्रकल्प अभियंत्यास दहा हजारांची लाच घेताना अटक