नवी दिल्ली: जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेतील असणाऱ्या महिला खासदारांचा कामकाजात जास्तीत जास्त सहभाग वाढविण्यासाठी पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या 25 पेक्षा जास्त महिला खासदारांचा समावेश असलेल्या गटाचे महिला प्रतोदपद खासदार स्मिता वाघ यांच्याकडे असणार आहे.