मुंबई : भारतातील लोक आता रिअल टाईममध्ये सिंगापूरमधून थेट UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), ॲक्सिस बँक आणि ICICI बँकांच्या ॲप्सद्वारे पैसे प्राप्त करू शकतात. ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (NPCI) ने ही सुविधा सुरु केली आहे. ही सुविधा BHIM, PhonePe आणि Paytm ॲप्स युजर्सना मिळू शकणार आहे.
याशिवाय ॲक्सिस बँक, डीबीएस बँक इंडिया, आयसीआयसीआय बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि एसबीआय या बँका त्यांच्या ॲप्सद्वारे ही सुविधा देतात आणि ‘थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर’ (TPAP) आणि बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक, HDFC बँक, IDFC फर्स्ट बँक, इंडसइंड बँक, करूर वैश्य बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, साउथ इंडियन बँक आणि UCO बँकमध्ये देखील ही सुविधा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
NPCI ने म्हटले आहे की, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि सिंगापूरच्या PayNow मधील क्रॉस-बॉर्डर करारामुळे भारतीयांना परदेशी लोकांकडून थेट त्यांच्या बँक खात्यात त्वरित आणि सुरक्षितरित्या पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा मिळते. ही सुविधा सातही दिवस आणि 24 तास उपलब्ध असणार आहे.