मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आपल्या वक्तव्यामुळे अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चेत येणारे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज पुन्हा एकदा आपल्या एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. कंभोज यांनी आपल्या सोशल मिडियावरती एक पोस्ट केली असून त्यामध्ये एका अकाऊंटला टॅग करत धमकी दिली आहे. कंबोज यांच्या या पोस्टमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
त्यांनी गजाभाऊ नावाच्या एका एक्स युजरला (पुर्वीचे ट्विटर) टॅग करत पोस्ट केली, त्यामध्ये त्यांनी थेट धमकी दिली आहे. कंबोज यांनी गजाभाऊ नावाच्या युजरला टॅग करून पोस्ट लिहली असून त्याने देखील मोहित कंबोज यांना जोरदार उत्तर दिले आहे. यावरून आता विरोधकांनी देखील मोहित कंबोज यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मोहित कंबोज यांची पोस्ट शेअर करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पक्षाला चांगलेच धारेवर धरले आहे. अंबादास दानवेंनी ‘या असल्या कारभाऱ्यांनी भाजपचे ‘कंभोजीकरण’ झाले आहे. तत्ववादी नेत्यांचा पक्ष आज ‘ह्याला उचल, त्याला उचल’ची भाषा करतो, जे यांना अजिबात शोभत नाही.. महाराष्ट्रात अश्या धमक्यांना थारा नाही, मराठी माणसाबद्दल तर अजिबात नाही! फिकर नॉट गजाभाऊ’, असे पोस्ट म्हटले आहे. तर मोहित कंबोज ज्या अकाऊंंटला टॅग करून धमकीवजा पोस्ट लिहली आहे, त्याला अंबादास दानवे काळजी करू नका, असे म्हटले आहे.
मोहित कंबोज यांची पोस्ट
‘माझे पुढचे टार्गेट गजाभाऊ’ असं म्हणत मोहित कंबोज यांनी @gajabhauX या एक्स आयडीला टॅग केलं आहे. तर ‘धरती पे किधर भी होगे , उठा के लाए गे!’ अशी धमकी देखील मोहित कंबोज यांनी दिली आहे. ‘हर हर महादेव’ असं लिहून ही पोस्ट सेव्ह करुन ठेवा, असंही कंबोज यांनी लिहिले आहे. कंभोज यांच्या पोस्टवर गजाभाऊ नावाच्या एक्स अकाऊंटवरुन मोहित कंबोज यांना जोरदार उत्तर देण्यात आलेले आहे. गजाभाऊ या अकाऊंटने उत्तर देताना, “येताना एकटा येऊ नकोस बापाला संगती घेऊन ये… मी पण वाट बघतोय…”, असं लिहलं आहे.
My next target @gajabhauX !
धरती पे किधर भी होगे , उठा के लाए गे !
हर हर महादेव 🙏
Save the tweet 🐥— Mohit Kamboj Bharatiya (@mohitkamboj_) December 1, 2024
येताना एकटा येऊ नकोस बापाला संगती घेऊन ये ..
मी पण वाट बघतोय— गजाभाऊ (@gajabhauX) December 1, 2024
कोण आहे गजाभाऊ ?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळापासून या सोशल मिडिया अकाऊंटवरून अनेक पोस्ट शेअर दिसत आहे. जवळपास या सर्व पोस्टमध्ये भाजपसह महायुतीमधील पक्षांना लक्ष करून संबंधित अकाऊंटवरुन अनेक पोस्ट शेअर करण्यात आलेल्या आहेत. तर अकाऊंटच्या बायोमध्ये “जन्माने बॉक्सर, मुंबईकर पुणेकर आणि सांगलीकर, यांत्रिकी अभियंता संस्थापक सदस्य भाऊ गँग” असं म्हटले आहे. हे एक्स हँडल व्हेरीफाईड हँडल आहे. या अकाऊंटचे 27.6K एवढे फॉलोअर देखील आहेत.