नवी मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. परंतु, गणेश नाईकांच्या प्रवेशाला राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा जोरदार विरोध असल्याचे बोलले जात आहे. यासाठी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निवास्थानी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत गणेश नाईक यांच्या प्रवेशाला पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला.