नवी मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी एम. के. मढवी यांना अटक करण्यात आली आहे. ऐरोलीतील माजी नगरसेवक असलेल्या एम के मढवी यांना अटक करण्यात आली आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. ठेकेदाराला अडीच लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.