Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Milk Rate : सरकारने दूध दराबाबत बोलावलेली बैठक निष्फळ; संतप्त शेतकऱ्यांची आंदोलनाची घोषणा

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 21 November 2023, 20:56
Milk rate meeting not fruitful, shetkar sanghtna to protest on 24 in maharashtra

मुंबई : मंगळवारी दूध दराबाबत (milk rate) राज्य सरकारने बोलावलेली बैठक निष्फळ ठरली आहे. राज्य शासनाने दूध दराबाबत काढलेला आदेश मान्य करण्यास दूध कंपन्यांनी नकार दिला असल्याचे शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे. यानंतर शेतकरी संघटना चांगल्याच संतप्त झाल्या असून त्यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. तर, दुसरीकडे राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सर्वांची भूमिका ऐकून घेतली आहे. सर्वांनी संयम बाळगला पाहिजे, असे म्हटले आहे. ही बैठक संपल्यानंतर आक्रमक झालेल्या दूध उत्पादक शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सह्याद्री अतिथीगृहाबाहेर शासनाच्या आदेशाची होळी करत संताप व्यक्त केला.

दूध दर प्रश्नी राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृह येथे दूध संघ, दूध कंपन्या आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक पूर्णपणे निष्फळ ठरली असल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला.

दरम्यान राज्य सरकारने स्वतः पुढाकार घेत सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांची, संघटना यांची भेट घेतली असल्याचे विखे-पाटील यांनी म्हटले. या बैठकीत सरकारने सर्वांची भूमिका जाणून घेतली. मध्यंतरी राज्य सरकारने पुढाकार घेऊन 34 रुपये दर जाहीर करत शासकीय आदेश काढला होता. त्यानंतर काही दूध संघांनी भाव कमी केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

राज्याच्या दुग्धविकास मंत्र्यानी दूध संघ, दूध कंपन्या व शेतकरी प्रतिनिधींची दुध दराबाबत बोलावलेली बैठक निष्फळ ठरली आहे. शासनाने काढलेला दूध दर आदेश दूध कंपन्यांनी धुडकावून लावला आहे. तसेच सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 34 रुपये दर देण्यास नकार दिला असल्याची माहिती दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिली. सरकारने काढलेल्या आदेशाची अशी अवहेलना होत असताना सरकार बैठकीत केवळ गुळमुळीत सारवासारव करताना दिसले असल्याचा आरोप नवले यांनी केला. रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनीदेखील शासनाने काढलेल्या आदेशापेक्षाही 9 ते 10 रुपये कमी दर मिळत असल्याचे म्हटले.

दूध उत्पादक शेतकरी संघटनांकडून आंदोलनाची घोषणा

राज्य सरकारच्या आदेशाची किंमत ही रद्दी एवढी असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा रद्दी शासन आदेशाची 24 नोव्हेंबर रोजी राज्यभर दूध संकलन केंद्रांवर शेतकऱ्यांनी होळी करावी आणि विविध मार्गाने आंदोलन तीव्र करावे, असे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केले आहे. महाराष्ट्रभर शेतकरी कार्यकर्ते उपोषण, रास्तारोको व दुग्ध अभिषेक घालून दूध दराच्या प्रश्नांसाठी आंदोलन करत आहेत. या सर्व आंदोलनांना संघर्ष समिती पाठिंबा व्यक्त करत असल्याचे डॉ. अजित नवले यांनी सांगितले.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post
FIR registered against two for organizing dance in bhandra

Bhandara: भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात अश्लील डान्सचा अक्षरशः हैदोस, स्टेजवरच मुली विवस्त्र अन् व्हिडीओ व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.