मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या गेलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली ही यादी तात्पुरत्या स्वरूपाची आहे. वैद्यकीय अहवाल विचारात घेऊनच उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन स्वरूपात सादर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याच्या सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिल्या आहेत.
या परीक्षेमध्ये महेश घाटुळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, प्रीतम सानप या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर शुभम पवार याने बाजी मारली असून, मुलींमध्ये वैष्णवी बावस्कर हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दरम्यान, विविध न्यायालयात किंवा न्यायधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणांवरील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून ही गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.
या प्रक्रियेनंतर उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पदांचे पसंतीक्रम सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे. तसेच अधिक माहिती, आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आली असल्याचे देखील कळविले आहे.
जा.क्र. 121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.https://t.co/Bg4YnO0CiD pic.twitter.com/heyNjm1sNL
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) September 26, 2024