मुंबई : मराठा आरक्षणाच्याबाबत राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची सोमवारी सकाळी 10 वाजता मंत्रालयात बैठक पार पडणार आहे. मराठवाडा विभागातील मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात नेमलेल्या समितीकडून राज्य सरकारने माहिती मागवली आहे. या समितीने आतापर्यंत काय काम केले? याचा अहवाल उपसमितीला सादर करावा लागणार आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय ज्वलंत झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या हालचालीसुद्धा वाढल्या आहेत. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. म्हणून राज्य सरकार समोरच्या अडचणी देखील जास्त वाढल्या आहेत. मराठा आरक्षण देणारच असा शब्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक जास्त तीव्र होत चालले आहे.