पुणे : आझाद मैदानातील उपोषणाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार कोर्टात गेले आहेत. मराठा आंदोलक उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. अचानक नोटीस पाठवून आझाद मैदानातील उपोषणाला परवानगी नाकारल्याने मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याविरोधात वीरेंद्र पवार कोर्टात गेले आहेत.
मजा करायला मुंबईला निघालो नाही
दुसरीकडे मजा करायला मुंबईला निघालो नाही, तोडगा काढा असे मनोज जरांगे म्हणाले. मुंबईला जाण्याची हौस नाही, आरक्षण द्या, गावी जातो, असा पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतला.
नोटीसला किंवा कारवाईला घाबरत नाही
मनोज जरांगे हे कोणत्याही नोटीसला किंवा कारवाईला घाबरत नाहीत, आम्ही मुंबईकडे जात आहोत, असे जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी नोटीसमध्ये आंदोलनासाठी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 29 मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवले आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले?
आम्ही आतापर्यंत लोणावळ्यात थांबलो आहोत. कारण आम्हाला मार्ग काढायचा आहे. आम्हाला आरक्षण मिळणार आहे, मिळाल्यावर गावाकडे जाऊ. आम्हाला तिकडे मुंबईत जाण्याची हौस नाही. पण मराठा समाजाला आरक्षण हवे. दीड दिवसापूर्वी तेच सांगितलं, आठ दिवसापूर्वी तेच सांगितले. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, आम्ही तोपर्यंत मुंबईकडे जातो.
तोडगा काढायचाय
मला विनंती करायची आहे, आम्हाला तोडगा काढायचा आहे, आम्ही मजा करायला मुंबईला आलो नाही. मुंबईकरांचे आणि आमचेही हाल होऊ नयेत. त्यामुळे तोडगा काढा. मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, अजितदादा या तिघांनी चर्चा करावी, लगेच तोडगा काढावा. जुने नवे शिष्टमंडळ येते पण तोडगा निघत नाही. तिघापैकी एकाने येऊन तोडगा काढून जावं, असे मनोज जरांगे म्हणाले.