मुंबई : देवदर्शनाने नवीन वर्षांची सुरुवात करण्याची भारतीय संस्कृतीत प्रथा आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी भाविक मंदिरांमध्ये गर्दी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर देवदर्शन घेणाऱ्या भाविकांची गैर सोय होऊ नये म्हणून राज्यातील महत्वाची मंदिरे नववर्षाच्या स्वागतासाठी २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशानसनाने घेतला आहे. त्यामुळे भाविकांना दिवसा आणि रात्रीदेखील दर्शन घेता येणार आहे.
ही मंदिरे २४ तास राहणार खुली
शिर्डी साई मंदिर, कोल्हापुरातील अंबाबाईचे मंदिर, पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना देवदर्शन घेता येणार आहे. शिर्डी साईमंदिर ३१ तारखेला २४ तास खुलं राहील, कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर पहाटे ५ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत अंबाबाईच्या दर्शनासाठी खुले राहणार आहे.
तुळजा भवानीचं मंदिर रात्री ११ वाजेपर्यंत खुलं रहाणार आहे. १ जानेवारीला रात्री १ वाजल्यापासून दर्शन करता येणार आहे. पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर रात्री ११ पर्यंत खुलं रहाणार आहे. शेगाव मधील गजानन महाराज मंदिर दर्शनासाठी २४ तास खुल रहाणार आहे. नाशिकचं सप्तश्रृंगी मंदिर ३१ तारखेला २४ तास खुलं राहील
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताला देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी मंदिर २४ तास खुलं राहणार आहे. आज ३१ डिसेंबरला रविवार असल्याने भाविकांची गर्दी अडीचपट वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर ट्रस्टने मंदिरे २४ तास खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.