वाशी : सरकारने आज रात्रीपर्यंत अध्यादेश काढावा, आजची रात्र वाशीतच काढतो असा अल्टीमेटम मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. नसेल तर उद्या दुपारपर्यंत अध्यादेश द्या, नाहीतर पुन्हा मुंबईकडे निघणार. आज सकाळी 11 पासून उपोषण सूरू केले आहे, उद्यापासून पाणी देखील सोडून देईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
जो अध्यादेश आपण काढणार आहात त्यामध्ये मोफत शिक्षण, सगेसोयऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट आणि सरकारी भरती केलाच तर आमच्या जागा राखीव ठेऊन करा या गोष्टींचा समावेश करावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.
काय म्हणाले मनोज जरांगे?
शासनाला आपण ज्या मागण्या केल्या होत्या, आणि ज्यासाठी आम्ही मुंबईत आलो होतो त्यावर चर्चा झाली. सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे हे सरकारच्या वतीने आले होते. त्यांनी सरकारची भूमिका सांगितली. लोक म्हणत होती की मराठ्यांना आरक्षण मिळणारन नाही. मग 57 लाख नोंदी काय आहेत? या 57 लाखांमुळे प्रत्येकी पाच जणांना आरक्षण मिळून अडीच कोटी लोकांना फायदा होणार आहे. आता फक्त यासाठी अध्यादेश गरजेचा आहे, म्हणून आपल्याला मुंबईपर्यंत यावे लागले आहे. आजची रात्र आम्ही इथेच काढतो, पण अध्यादेश काढावा, असे जरांगे म्हणाले आहेत.
37 लाख लोकांना सर्टिफिकेट दिले त्याची यादी द्या
सरकारने 57 लाख नोंदी सापडल्याचे सांगितले आहे. त्यापैकी 37 लाख लोकांना प्रमाणपत्र वितरित केले असे सांगितले आहे. त्याचे पत्र आपल्याकडे दिले आहे. त्यांच्या वंशावळी जुळवणे सुरु आहे. त्यासाठी समिती केली आहे. त्याची यादी जरांगे यांनी मागितली आहे.
मनोज जरांगे यांच्या मागण्या काय काय?
– नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या.
– शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या.
– कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना 100 टक्के शिक्षण मोफत करा.
– जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा.
– आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा .
– आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे घ्या.
– SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या .
– वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या.
– रात्रीपर्यंत शासननिर्णयाचे अध्यादेश द्या, आझाद मैदानात जात नाही.
– सग्या सोयऱ्याबाबत आद्यादेश नाही. तो सर्वात महत्वाचा आहे.