डोंबिवली : पतीने आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधांचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याचा खळबळजनक प्रकार डोंबिवलीमधून समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी पतीविरोधात मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर फिर्यादी 35 वर्षीय महिला डोंबिवलीच्या आजदेगाव परिसरामध्ये राहण्यास आहे. गेल्या काही दिवसांपासून पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीला होता. पत्नी आपण कामावर गेल्यावर काय करते? हे पतीला पाहायचे होते, त्यामुळे आपल्याच बेडरूममध्ये त्याने छुपे कॅमेरे लावले.
गेल्या 15 दिवसांपूर्वी पत्नीचा मित्र घरी आला. त्यानंतर दोघांमध्ये शारिरिक संबंध झाले. पत्नी आणि तिच्या मित्राच्या शारिरिक संबंधांचे शुटिंग छुप्या कॅमेरामध्ये कैद झाले. महिलेच्या पतीने त्या दोघांच्या शारीरिक संबंधांचा व्हिडिओ पाहिला आणि त्याचा राग अनावर झाला. यानंतर पतीचे पत्नीसोबत जोरदार भांडणही झाले.
पती एवढ्यावरच थांबला नाही. त्याने पत्नी आणि तिच्या मित्राची बदनामी करण्यासाठी छुप्या कॅमेराने केलेले शुटिंग थेट सोशल मीडियावर अपलोड केले. पत्नीला ही बाब समजल्यानंतर तिने थेट मानपाडा पोलीस स्टेशन गाठत पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पतीविरोधात विनयभंगाचा आणि समाजात बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गोरे पुढील तपास करत आहेत.