मुंबई: मालवणमधील राजकोट किल्ल्यावरच्या शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी चेतन पाटील आणि जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान त्यांची आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना मालवण कोर्टात हजर करण्यात आले.
आज त्यांच्या कोठडीवर कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने चेतन पाटीलला दिलासा दिला असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. तर जयदीप आपटेची 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आजच्या सुनावणीसंदर्भात सरकारी वकील ॲड. तुषार भणगे यासंदर्भात माहिती दिली आहे.
ॲड. तुषार भणगे म्हणाले की, आरोपी जयदीप आपटे विसंगत माहिती देत आहे. त्यामुळे सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, परंतु न्यायालयाने 13 तारखेपर्यंत (तीन दिवसांची) पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आरोपी चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.