ठाणे : उल्हासनगरमधील पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या घटनेनं राज्यात मोठी खळबळ उडाली आहे, भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांच्यामध्ये पोलीस ठाण्यात जोरदार राडा झाला. त्यानंतर वाद मिटवण्यासाठी दोघेही पोलीस स्टेशनमध्ये गेले मात्र तिथे वाद आणखी टोकाला गेला.
वाद वाढल्यानं गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महेश गायकवाड सध्या धोक्यातून बाहेर आहेत. त्यांना जनरल वार्डमध्ये शिफ्ट केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
दरम्यान, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचा मुलगा वैभव गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. याचदरम्यान, या गोळीबारात गंभीर जखमी झालेले माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महेश गायकवाड यांना जनरल वार्डमध्ये शिफ्ट केल्याची माहिती समोर आली आहे.