मुंबई: महाविकास आघाडीची रविवारी (13 ऑक्टोबर) संयुक्त पत्रकार परिषद पार पडल्यानंतर आता महायुतीकडूनदेखील संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी बिगुल उद्याच (15 ऑक्टोबर) वाजण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीची सुद्धा संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे.
आता या पत्रकार परिषदेतून कोणती माहिती दिली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता महायुतीकडून निर्णयांचा धडाकाच लावण्यात आला आहे. जवळपास साडेबाराशेच्या जवळपास शासकीय निर्णय घेण्यात आले असून सर्वच घटकांना खुश करून टाकण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे सरकारकडून करण्यात आला आहे.