मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा तिढा सुटण्यापूर्वीच मुंबईत मातोश्री बाहेर महायुतीने बॅनरबाजी केली आहे. बांद्रा ते एअरपोर्ट परिसरामध्ये महायुतीचे बॅनर झळकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मातोश्री बाहेर बॅनर मातोश्री बाहेर लावला आहे. मुंबई महायुतीचीच असा आशय असणारा हा बॅनर मातोश्री परिसरामध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मुंबईमध्ये लोकसभेच्या सहा जागा आहेत. त्यापैकी तीन जागेवर शिवसेनेचे खासदार आहेत. मात्र यंदा महायुतीचा बॅनर लावून या सर्व जागांवर आपलेच खासदार निवडून येतील, असा विश्वास या बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.