मुंबई: नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाव्हिस्टा उभारले जाणार आहे. नव्या प्रोजेक्टमध्ये मंत्रालय, मंत्र्यांची निवासस्थाने, आमदारांची निवासस्थाने, नवीन विधिमंडळ आणि सनदी अधिकारी यांची निवास्थानांसह सर्व सोयी सुविधा एकाच ठिकाणी असणार आहेत.
राज्यातील महाव्हिस्टासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर निवीदा काढल्या जाणार आहेत. त्यासाठी साडेसात हजार कोटींहून अधिक खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. मंत्रालय परिसरातील सात एकर जागेवर टोलेजंग इमारती उभ्या करुन महाव्हिस्टा तयार करण्याचा राज्य सरकरचा प्रयत्न आहे. यामुळे मंत्रालयात परिसरात एकाच ठिकाणी सर्व काही उपलब्ध होणार आहेत.